प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा ता. नवापूर येथे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम.
शिबिरात विविध प्रकारच्या 150 जणांची कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात आली
नवापूर प्रतिनिधी.
प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा ता. नवापूर जि. नंदुरबार येथे कर्करोग तपासणी करण्यात आली.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी.सातपुते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा ता. नवापूर जि. नंदुरबार येथे कर्करोग तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.या शिबिर मध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश मावची डॉ.संजय बहिरम ( सर्जन ) एमडीएस डॉ.धीरज महाजन,स्त्रीरोगतज्ञ डॉ.अमोल वळवी,पॅथॉलॉजिस्ट डॉ योगेश बडक,डॉ प्रमिला अहिरे, प्रा.आ.केंद्र चिंचपाडा वैद्यकीय अधिकारी डॉ करण पाटील,आणि समुदाय आरोग्य अधिकारी व कॅन्सर वैन टीम,सर्व कर्मचारी उपस्थित होते.सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रूग्ण व त्यांच्या नातेवाईकाची कर्करोग तपासणी,आरोग्य तपासणी व जनजागृती करण्यात आली.या शिबिरात विविध प्रकारच्या 150 जणांची कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात आली. त्यात मुख कर्करोग,गर्भाशय कर्करोग,स्तन कर्करोग या प्रकारच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात आली व संदर्भ सेवा देण्यात आली. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्करोग तपासणी व्हॅनच्या माध्यमातून स्थानिक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच रोग प्रतिबंधक उपाययोजनां बाबत जनजागृती करण्यात आली