Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता १० वी परीक्षेच्या घवघवीत निकाल



श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता १० वी परीक्षेच्या घवघवीत निकाल.
@ पुष्कर गोविंदा कोळी प्रथम, आदिवासी गटात प्रशाली गावित तर दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये अंकिता गावित प्रथम..!
@ इयत्ता १० परीक्षेचा निकाल ९२.५२ टक्के..!
@ शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा शाळेने ठेवली कायम..!
नवापूर प्रतिनिधी--
नवापूर येथील नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकाल ९२.५२ टक्के लागला आहे.शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे.इयत्ता दहावी परीक्षेत ही श्री शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. पुष्कर गोविंदा कोळी (४५६) ९२.२० टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे तर दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये अंकिता मुकंदर गावित ८९ टक्के गुण मिळवून प्रथम आली तर द्वितीय मित्तल अजय बिऱ्हाडे ,( ४४७) ९१.४० टक्के,द्वितीय दीक्षा संदीप पाटील (४४७) ९१.४० टक्के तर तृतीय क्रमांक गायत्री योगराज सोनार (४५३) ९०.६० टक्के, प्रशाली सुरेश गावित ही विद्यार्थिनीला ( ४५१) ९०.२० टक्के चतुर्थ तर आदिवासी गटात प्रथम आली आहे तर वैशाली गणेश वसावे (४४५) ८९ टक्के गुण मिळवून पाचवी आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेची उज्वल परंपरा या निकालाने शाळेने कायम ठेवली आहे‌. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शाळा प्रयत्नशील असते.
सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी मॅडम, उपमुख्याध्यापक ए.एन सोनवणे सर, उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी सर, पर्यवेक्षक हरीश पाटील सर, पर्यवेक्षक जी‌.डी सुरवंशी सर, पर्यवेक्षक जगदीश वाघ सर यासह शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.