@ कोंडाईबारी घाटाची पाहणी केल्यानंतर खासदारांनी दिल्या सूचना-अपघातातील जखमींची ही केली विचारपूस..!
कोंडाईबारी घाटात अपघाताचे सत्र सुरुच असून महामार्ग झाल्यापासून कोंडाईबारी घाट अपघाताचा घाट बनला आहे. कोंडाईबारी घाटात होत असलेले अपघात पाहता यावर कोणतीही उपाय योजना करण्यात येत नाही. मध्यंतरी पाहणी करून देखील त्यानंतर अपघात रोखण्यासाठी कोणती उपाययोजना झालेली नाही.
कोंडाईबारी घाटात एका दिवसापुर्वी एसटी बस पलटी होऊन काही प्रवासी जखमी झाले होते.या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे खासदार एडव्होकेट गोवाल पाडवी यांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला.
खासदार श्री पाडवी यांनी घटनास्थळी पाहणी करत घाटातील वाहतूक आणि रस्त्यांची स्थिती जाणून घेतली. त्यांनी रस्ता बांधकाम ठेकेदार आणि अभियंत्यांना तातडीने आवश्यक सूचना दिल्या. तसेच, जखमी प्रवाशांची विचारपूस केली.
यावेळी साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे आणि तालुक्यातील नेते उपस्थित होते. कोंडायबारी घाटातील रस्त्याच्या दुरवस्थेवर खासदार पाडवी यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. खासदारांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर यावर काय उपाययोजना होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.