डॉ.स्वप्निलकुमार भरतभाई पाटील हे बडोदा येथील पारुल मेडिकल कॉलेज मधून एमडी (बालरोगतज्ज्ञ) पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण.
नवापूर येथील रहिवाशी डॉ.स्वप्निलकुमार भरतभाई पाटील हे बडोदा येथील पारुल मेडिकल कॉलेज मधून एमडी (बालरोगतज्ज्ञ) पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नुकतेच त्यांना पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. गेल्या काही वर्षापासून डॉक्टर स्वप्नीलकुमार पाटील हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अथक परिश्रम करून
एमडी (बालरोगतज्ज्ञ) पदव्युत्तर परीक्षेत यश मिळवले आहे.डॉक्टर स्वप्नीलकुमार पाटील हे नवापूर येथील प्रसिद्ध उद्योजक तथा मार्च शिक्षण संस्था नवापूर (वनिता विद्यालय नवापूर) या संस्थेचे खजिनदार भरतभाई रघुनाथभाई पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत.डॉक्टर स्वप्नीलकुमार पाटील यांचे नातेवाईक,समाज बांधव,बडोदा येथील पारुल मेडिकल कॉलेज चे प्राचार्य, प्राध्यापक, मित्रपरिवार सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.