या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही
अवकाळी पाऊस-- वाहन चालकांनो महामार्गावर व कोंडाईबारी घाटात वाहन सावकाश चालवा..
नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील एप्पल हॉटेल जवळील बर्डीपाडा फाट्याजवळ कारचे भीषण अपघात झाला. अपघात होताच परिसरातील लोक घटनास्थळी धावून गेले.
काही महिन्यापूर्वी महामार्ग व कोंडाय बरी घाटामध्ये तसेच जन्माला गटात अपघाताचे सत्र सुरू झाले होते मध्यंतरी अपघात थांबले असताना आता पुन्हा कोंडाईबारी घाट व महामार्गावर अपघात सुरू झाले आहेत. अवकाळी पाऊस होत असल्याने वाहन चालकांनी वाहन सावकाश चालवणे गरजेचे आहे.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे
धुळे सुरत महामार्गावर पुन्हा अपघाताचे सत्र सुरू झाल्यामुळे वाहन चालकांनी चिंता व्यक्त केली आहे
रात्री दहा वाजेच्या दरम्यान दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणारी कार क्रमांक एम एच 05 सी व्ही 01 14 या कार वरील चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कार इलेक्ट्रॉनिक खांबाला धडकून रस्त्याच्या मध्ये मध उभी होती. कार चालक हा कार मध्येच अडकला होता त्याला विसरवाडी येथील तरुणांनी बाहेर काढून कार रस्त्याच्या कडेला धक्का मारून उभी केली होती.
अपघात एवढा भीषण होता की इलेक्ट्रॉनिक खांब तुटून पडला आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. देव बलवंतर होते म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती या अपघातातून पाहायला मिळाली. महामार्ग व कोंडाईबारी घाटामध्ये अपघात होत असताना प्रशासन मात्र यावर कोणतीही उपाययोजना करत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे असले तरी वाहन चालकांनी वाहन चालवताना काळजी घेणे तेवढेच गरजेचे आहे असे बोलले जात आहे.