नवापूर शहरातील मुस्लिम समाजातील शीश मीरपरवेज अली सैय्यद येथे बारावी परीक्षेत घवघवीत यश..!
नवापूर शहरातील मुस्लिम समाजातील शीश मीरपरवेज अली सैय्यद या विद्यार्थ्यांने इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याला विज्ञान शाखेत ८०.१७ टक्के गुण मिळाले आहेत. गैस शेगडी रिपेरींग तसेच लहान व्यवसाय चालवून त्याने हे यश प्राप्त केले आहे. व्यवसाय करीत असताना बारावीच्या परीक्षेतही तेवढ्याच मेहनतीने त्याने अभ्यास केला.
स्वतावर आत्मविश्वास तसेच विषय शिक्षकांचे मार्गदर्शंन,जिद्द चिकाटीने हे यश मिळाल्याचे
शीश मीरपरवेज अली सैय्यद याने सांगितले. तो सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी आहे. तो नवापूरचे प्रसिद्ध एडवोकेट पमा सैय्यद यांच्या सुपुत्र आहे.
शीश मीरपरवेज अली सैय्यद याच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.