बांधकाम कामगारांना भांडी वाटपात गोंधळ -शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले योजना महायुती सरकारचीच, योजनांचे स्वतः घेऊ नये..
कामगार महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी केल्यानंतर भांडी वाटपाला सुरुवात
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच आणि भांडी वाटपावरून पुन्हा वाद निर्माण झाला. मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत वाटप सुरू न झाल्याने, मध्यरात्रीपासून रांगेत उभ्या असलेल्या लाभार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी कामगार महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी केल्यानंतर भांडी वाटपाला सुरुवात झाली.
लाभार्थ्यांचा संताप--!
बांधकाम कामगार भांडी योजनेअंतर्गत कामगारांना सुरक्षा संच व स्वयंपाकाच्या भांड्यांचा संच मोफत मिळतो. मंगळवारी वाटप होणार असल्याने लाभार्थ्यांनी आरध्या रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंतही वाटप सुरू न झाल्याने लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, ज्यामुळे वाद निर्माण झाला.
रघुवंशींची मध्यस्थी--!
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे तक्रार झाल्यावर, त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर ॲड. राम रघुवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन ठेकेदाराला जाब विचारला. लोकप्रतिनिधींच्या हस्ते वाटप करण्याच्या अट्टहासापायी लोकांना ताटकळत ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामगार महामंडळ अधिकारी आणि ठेकेदाराशी चर्चा करून त्यांनी तातडीने भांडी वाटपाला सुरुवात केली.
श्रेयवादाला नकार--!
"ही योजना शासन, प्रशासन आणि महायुती सरकारची असून, कोणीही याचे श्रेय घेऊ नये," असे ॲड. राम रघुवंशी यांनी ठामपणे सांगितले. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ वेळेवर मिळायलाच हवा, यावर त्यांनी भर दिला.