नवापूर येथे हिंदूसूर्य, वीर शिरोमणी, क्षत्रिय कुलगौरव महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
नवापूर येथे वीर महाराणा प्रताप सिंह जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित हिंदूसूर्य,वीर शिरोमणी क्षत्रिय कुलगौरव महाराणा प्रताप सिंह जी जयंती उत्सव 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवापूर शहरात वीर महाराणा प्रताप सिंहजी यांची ४८५ वी जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम राजपूत समाजाचे सागर छगन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधनाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वीर महाराणा प्रताप यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन सर्वप्रथम करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिऱ्हाडे,अजय वसावे,रमेशचंद्र अग्रवाल, रोशन नाईक, धनंजय गावित, शंकर दर्जी, राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, चंद्रकांत नगराळे, विशाल सांगळे,एजाज शेख, अमृत लोहार,मंगेश येवले, सुनील पाटील, हेमलता पाटील, धर्मेश पाटील, अजय पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष उमेश मोरे, दर्शन दीपक पाटील आदी उपस्थित होते. वीर महाराणा प्रताप यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करून उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. सर्वांनी अभिवादन केले. त्यानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी मोक्ष दर्शन पाटील याने वीर महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. सायंकाळी सराफ गल्ली येथील सजवलेल्या ट्रॉलीतून वीर महाराणा प्रतापसिंह यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मोठ्या जल्लोषात व उत्साहात शोभायात्रेत समाज बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात समाजातील महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रा मुख्य मार्गावरून जात सराफ गल्ली सांगता करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष उमेश मधुसूदन मोरे उपाध्यक्ष रवी योगेश पाटील सचिव गोलू राजेंद्र राजपूत, खजिनदार भिकन खुमानसिंग पाटील यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शहरातील सर्व गणेश मंडळाचे सहकार्य लाभले.