ज्यांच्यावर गुरूंची कृपा त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष होतो - वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज
नंदुरबार (प्रतिनिधी)
ज्यांच्यावर गुरूंची सदैव कृपा असते. असे शिष्य किंवा भाविकांचा सर्वांगीण उत्कर्ष होत असतो. खानदेशात राम नामाची परंपरा जोपासणारे परमपूज्य सद्गुरु दगडूजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादामुळेच
आज नंदुरबारसह महाराष्ट्राबाहेर देखील भागवत कथा करण्याची संधी मिळाली आहे. हरिद्वार आणि ऋषिकेश येथे पाच वेळा श्रीमद् भागवत कथा झाली. म्हणून श्रीमद भागवत कथा तीर्थस्वरूप देवाच्या दिव्य लिलेचे माध्यम आहे. असे प्रतिपादन भागवताचार्य वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले.
नंदुरबार शहरातील दत्त कॉलनीत मंगळवारपासून श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ झाला आहे. दररोज दुपारी चार ते सात या वेळेत कथेचे निरूपण वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज करीत आहेत.
याप्रसंगी पुढे बोलताना अविनाश जोशी महाराज म्हणाले की, अनेकांच्या जीवनात जिवंतपणी तीर्थ स्थानाचा योग येत नाही. मात्र मृत्यु पश्चात श्रद्धावंत कुटुंबीय काशी किंवा तीर्थक्षेत्री अस्थी राख टाकण्याबाबत आग्रही असतात. म्हणून शक्य तेवढे जिवंतपणे तीर्थक्षेत्र जाऊन पुण्य प्राप्त करावे. तेही शक्य न झाल्यास किमान हरी कथेचा लाभ घ्यावा. जो हरी कथेचे श्रवण करेल तो पुण्य प्राप्त करेल. एक गंगा ज्ञान देणारी आणि दुसरी गंगा मुक्त करणारी आहे. मात्र भागवत कथा ज्ञाना सह मुक्त करणारी असा दुहेरी भक्तीरसाचा मार्ग आहे. असे वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी सांगितले.संगीतमय
श्रीमद् भागवत कथेत पौरोहित्य महेंद्र जोशी करीत आहेत. हार्मोनियम वर आनंदा मराठे, तबला मुकेश पडोळे, आणि बँजोवर अजय राठोड सहकार्य करीत आहेत.
दरम्यान शनिवार दि. 9 मे रोजी दुपारी चार वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल. श्रीमद् भागवत कथा दररोज दुपारी चार ते सात या वेळेत सुरू आहे. सोमवार दि. 12 मे रोजी सकाळी 9 ते 12 कथा होईल. त्यानंतर महाप्रसाद वितरणाने कथेची सांगता होईल. भाविकांनी श्रीमद् भागवत कथा
श्रवण तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक यशवंत सोनार, छाया सोनार, हरीश सोनार,दिपाली सोनार, देवांशी सोनार आणि दत्त कॉलनी परिसरातील भाविकांनी केले आहे.