चिंचपाडा जवळ भीषण अपघात; वृद्धाचा मृत्यू, चौघे गंभीर-दोघ वाहने गेली खड्डयात
विसरवाडी परिसरात असलेल्या महामार्ग भागात अपघाताची सत्र थांबायला तयार नाही
नवापूर प्रतिनिधी
नवापूर-विसरवाडी महामार्गावर ८मे रोजी न्यू मनोहर हॉटेलजवळ एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या पिकअप व्हॅन (एमएच ४१ एयू ---) ने सारवट येथून चींचपाडा येथे जात असलेल्या दुचाकी (जीजे १९ जे २०९७) ला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली खड्ड्यात फेकले गेले आहे.
या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रूपसिंग पोचल्या वसावे (वय ७०, रा. चिचपाडा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातातील अन्य जखमी आत्माराम शिवराम वसावे (रा. चिंचपाडा), महेश युवराज वाघ (रा. टेबे, सटाणा), अरुण दादाजी सोनवणे (रा. महाड) आणि लोकेश लक्ष्मण अहिरे (रा. नामपूर, बागलाण) यांना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...