जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी यांचा नवापूर तालुका दौरा - नगरपालिका आढावा व रोजगार हमी कामांची पाहणी...नवापूर घनकचरा डेपो ची ही जिल्हाधिकार्या कडून पाहणी
जिल्हाधिकारी मिताली सेठी आज नवापूर दौऱ्यावर असताना नगर परिषद नवापूर यांच्या कार्यालयीन आढावा बैठक घेण्यात आली होती
गेल्या महिन्या भरा पासून घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराचा मनमानी कारभारा मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या अनेक वृत्त वाहिनी तसेच वृत्त पत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी नवापूर नगर परिषदे च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेत घनकचरा व्यवस्थापन डेपो ची पाहणी केली होती
नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराच्या पुराव्या सह जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकशाही दिनात तक्रारी दाखल केल्या होत्या त्याचीच दखल घेत आज जिल्हाधिकारी यांनी घनकचरा डेपो ची पाहणी करत आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांची कान उघाडणी करत ठेकेदाला कोणत्या आधारे बिले अदा करण्यात आली आहेत याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती सूत्रां कडून मिळाली आहे
जिल्हाधिकाऱ्यांकडून घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार आणि जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यावर काय कारवाई होईल या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे
जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या सोबत नवापूर चे तहसीलदार दत्तात्रय जाधव मुख्याधिकारी मयूर पाटील ही उपस्थित होते.
(बॉक्स मध्ये घेणे)
नगरपालिका भेट व आढावा
जिल्हाधिकारी यांनी नवापूर नगरपालिकेला भेट देत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. कचरा संकलन डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता व व्यवस्थापन सुधारण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या, नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. मयूर पाटील व नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. रोजगार हमी योजनेची पाहणीचिंचपाडा येथील वनविभागाच्या रोपवाटिकेची पाहणी करण्यात आली. यावेळी मजुरांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. कामाच्या गुणवत्तेवर समाधान व्यक्त करण्यात आले, भेटीदरम्यान तहसीलदार नवापूर श्री दत्ता जाधव, वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
@ प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता या दौऱ्याद्वारे विविध विभागांच्या कामांची थेट पाहणी करत प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला आहे.