करंजी खूर्दे येथे "कंपोस्ट खड्डा भरू, स्वच्छ गाव करू" या मोहिमेचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते लाल फित कापून व कंपोस्ट खड्डयात कचरा टाकून उद्घाटन..!
नवापूर प्रतिनिधी
१ मे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत करंजी खूर्दे येथे "कंपोस्ट खड्डा भरू, स्वच्छ गाव करू" या मोहिमेचे उद्घघाटन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते लाल फित कापून व कंपोस्ट खड्डयात कचरा भरण्यात येऊन करण्यात आले.कार्यक्रमा प्रसंगी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत ,करंजी बु गावाचे लोकनियुक्त सरपंच आर सी गावीत, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, ग्रामपंचायत करंजी खुर्दे चे सरपंच सुनील सदानंद चौधरी व सर्व ग्रा.प. सदस्य उपस्थित होते. यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक म्हणाले की या ग्रामपंचायत ने एक अंत्यत चांगला कार्यक्रम राबविला आहे कंपोष्ट खत शेतात वापरण्याची या काळात अत्यंत गरजेचे आहे.या कंपोष्ट खता मुळे उत्पन्न पण मिळणार आहे. प्लास्टिक वापरने बंद करा याचे दुष्परिणाम अंत्यत घातक आहे.तुम्हाला ग्रामपंचायत तर्फे ओला कचरा,सुका कचरा साठी डसबीन दिले आहे याचा वापर करा, आपले गाव स्वच्छ ठेवा, घंटागाडी सुध्दा डीपीसी मधुन २० ते २५ ग्रामपंचायतला या वर्षी देणार आहोत. नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी एम देवरे यांनी कचरा विलगीकरण व घरगुती कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नवापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण गावित, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस डी पाटील व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अरुण वरसाळे,ग्रामपंचायत करंजी खुर्दे चे ग्रामपंचायत अधिकारी बीना सरदार, जिल्हा परिषद नंदुरबार येथील एस बी एम कक्षाचे कर्मचारी कोळपकर , नरेंद्र वसावे तसेच ग्रामपंचायत करंजी खूर्दे येथील शिक्षण, आरोग्य, महसूल,महिला बालकल्याण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सरला पाटील यांनी केले.