नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर,तापमानाची वाढ बघता जिल्ह्यात उष्मघाताचे कक्ष सज्ज.
नवापूर प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात सरासरी तापमानाचा पारा हा 40 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत वाढला असून नागरिकांना उष्मघाताचा त्रास झाल्यास त्यांच्या तात्काळ उपचारासाठी जिल्हाभर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात उष्मघाताचे कक्ष तयार असून जिल्हा आरोग्य विभाग ॲक्शन मोडवरती.. जिल्ह्यात तापमानाची वाट बघता गरज असेल तेव्हाच बाहेर पडा उष्णतेपासून दूर राहण्यासाठी, उन्हाळ्यात, जास्त वेळ उन्हात फिरणे टाळा, भरपूर पाणी प्या, आणि गरम कपडे परिधान करणे टाळा .डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, उलट्या, आणि गोंधळ ही उष्माघाताची काही सामान्य लक्षणे आहेत.. जर तुम्हाला उष्माघाताची लक्षणे जाणवत असतील, तर लगेच वैद्यकीय मदत घ्या. सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या असून मुल दिवसभर खेळण्यासाठी उत्सुक असतात या वाढते तापमान बघता मुलांना जास्त वेळ उन्हात खेळू देऊ नका.. डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. त्यात नारळपाणी, फळांचे रस किंवा इतर थंड पेये देखील पिऊ शकता. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांनी दिली. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून मजुरी करून जगणाऱ्यांची संख्या जास्त असल्याकारणाने अशा रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाल्यास 108 रुग्णवाहिका सेवा तत्पर ठेवण्यात आरोग्य विभागाने काळजी घ्यावी अशी जनसामान्यांची मागणी आहे