नवापूर शहरातील शास्त्रीनगर भागातील खुल्या गटारी व संरक्षण झाकण तसेच काँक्रीटीकरण करुन मिळण्याची मागणी
नवापूर प्रतिनिधी
नवापूर शहरातील शास्त्रीनगर भागातील खुल्या गटारी व संरक्षण झाकण तसेच
काँक्रीटीकरण करुन मिळण्याची मागणी तथा निवेदन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे यांनी मुख्यधिकारी डॉ मयुर पाटील यांना दिले आहे.
नवापूर नगरपरिषद हद्दीतील शास्त्रीनगर परिसरात घाणीचे साम्राज्य असून सदर भागातील रहिवासींचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. यामुळे डास
मच्छरांनी उच्छाद मांडला असून शहरात साथीचे आजार सुरु आहे मलेरीया व टायफाईड या
आजाराने तोंड वर काढल्याने अनेक रुग्ण शहरात आढळून येत आहेत.तसेच शास्त्रीनगर परिसरात अनेक गटारींचे संरक्षण निघालेले असून त्या उघड्या अवस्थे आहेत. त्यामुळे रात्र पहाट सदर ठिकाणाहून येणारे-जाणारे वाटसरु व वाहनधारक यांचा अपघात होण्याची व खुल्या गटारीत पडण्याची किंवा जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी नवापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यचा विचार करता संबंधित आरोग्य विभागास आदेशित करुन शहरात नियमित स्वच्छता, आरोग्यासाठी औषध
फवारणी करणे बाबत कळवावे जेणेकरुन शहरात वाढणाऱ्या आजाराला प्रतिबंध लावता येईल.तसेच शास्त्रीनगर परिसरात असलेल्या उघड्या गटारींवर संरक्षण झाकण व त्यास काँक्रीटीकरण करुन लवकरात लवकर बंद करावे असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख अनिल आनंदा वारुडे यांची स्वाक्षरी आहे.