आज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ह्यांच्या 'नरकातला स्वर्ग' ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडला. हे पुस्तक म्हणजे प्रत्येकाला लढण्याची प्रेरणा देणारं पुस्तक आहे, असे उद्गार पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक सन्माननीय जावेद अख्तर आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार, तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले ह्यांनी ह्या पुस्तकातील अनुभव कथनास उत्तम दाद दिली.
प्रकाशन सोहळ्यास सौ.रश्मी वहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, हौसी वाचकवर्ग तसेच शिवसैनिक उपस्थित होते.