आष्टे परिसरातील गावांना अवकाळी पावसाचा फटका..
नवापूर प्रतिनिधी--
नंदुरबार तालुक्यातील आष्टे व परिसरात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.
१३ व १४ मे रोजी प्रचंड वादळासह जोरदार अवकाळी पाऊन झाला.त्यात आष्टे महसूल मंडळातील अजेपूर, हरिपूर, आष्टे,सुतारेसह अनेक गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कांदा पीक पाण्यात तरंगताना दिसून येत आहे.ग्रामीण भागात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यात घराचे पत्रे, मोठे वृक्ष, विद्युत खांब यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी
झाली नाही. या अवकाळी पावसाच्या वादळाने झालेले नुकसानीची पाहणी करण्यासाठी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी प्रत्यक्ष गावात व शेतात जाऊन पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना नंदुरबार तहसीलदारांना भ्रमणध्वनी द्वारे तात्काळ दिल्या. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जि.प.चे माजी सदस्य देवमन पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य कमलेश महाले, रामू कोकणी, पुरुषोत्तम पाटील व परिसरातील सरपंच उपस्थित होते.