मोदी सरकारने जातीनिहाय जनगणनेच्या निर्णय घेतल्याबद्दल नवापूर येथे भाजपातर्फे जल्लोष-पेढे वाटले-- फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव..!!
मोदी सरकारने जाती निहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने संपुर्ण देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन जल्लोश केला त्याच्याच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीचे तालुका कार्यालयात नवापूर विधानसभा क्षेञातील कार्यकर्त्यांनी फटाक्याचा आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. सरकारचा या महत्वपुर्ण व इतिहासीक निर्णया मुळे समाजातील सर्व तळागळातील सामाजिक आर्थिक व जातीय घटकान मुळे मागस राहीलेल्या अनेक घटकांना या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळेल व प्रगतीशील भारताचा वाटचालीत सहभागी होण्याची सर्वाना संधी मिळेल म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पेढे वाटुन आनंद साजरा करण्यात आला यावेळी विधानसभा क्षेञप्रमुख अजय वसावे,माजी तालुका अध्यक्ष अँड सत्यानंद गावीत,शहर मंडळ अध्यक्ष दिनेश चौधरी,नवापूर ग्रामिणचे मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे,विसरवाडी मंडळाचे अध्यक्ष दिलीप वळवी,कुश गावीत,राजभाई सोनी, शहर सरचिटणीस पवन दांडवेकर,शहर उपाध्यक्ष मनिष चौधरी,अल्पसंख्याक मोर्चा सचिव जाकीर पठाण,जिल्हा पदधिकारी आनंद चव्हाण,निलेष देसाई,रामचंद्र मिस्ञी,जगदीश जयस्वाल,जयंतीलाल अग्रवाल,दिलवरसिंग गावीत,घनशाम परमार,कनीलाल वळवी,साजन कोकणी,जिवराम पाडवी,निलेश गावीत,सुरेश पाडवी,राहुल वळवी,जिल्हा पदधिकारी समिर दलाल,तौसिफ मन्सुरी,चेतन वाघ,नामदेव देसाई,अजय कोकणी , दिनकर वसावे,अरविंद गावीत,सुभाष माळी,कांतीलाल गावीत,डोगरसिंग कोकणी,पंतु गावीत,विजय गावीत,सजाद बदुडा आदी उपस्थित होते..