नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात निपुण महाराष्ट्र अंतर्गत चावडी वाचन व गणन कार्यक्रम..!
@ बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला-उत्तमरित्या वाचन व गणिती क्रिया केल्या.. मान्यवर आणि दिले त्यांना बक्षीस...!!
नवापूर प्रतिनिधी --
निपुण महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राबवला जाणारा एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की, इयत्ता 1 ली ते 5 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणित या मूलभूत कौशल्यांमध्ये निपुण बनवणे त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिनी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत चावडी वाचन व गणन या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे उपस्थित होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते , केंद्रप्रमुख शैलेश राणा यासह शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी, उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे, पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी, पर्यवेक्षक जगदीश वाघ यासह शिक्षक व पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थांनी उत्तमरित्या वाचन व गणिती क्रिया केल्या .सहभाग नोंदवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस म्हणून पेन वाटण्यात आले .मान्यवरांनी विद्यार्थांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केलेले वाचन व गण न पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी उपस्थित पालकांच्या स्वागता सत्कार केला. त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते यांनीही निपुण महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या विविध माध्यमातून मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत शिक्षकांनी जागृत करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी डी सूर्यवंशी यांनी केले तर आभार जगदीश वाघ यांनी मानले.