आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांची जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक...
आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात संथगतीने सुरू आहे.ही अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी,प्रलंबित वन हक्क दावेदारांची सुनावणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिढार महामोर्चाला दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांचा उपस्थितीत सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आदिवासी विकास विभाग, वन विभाग, विद्युत वितरण कंपनी, मेढा , तसेच कृषी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते .या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्यात .
वनहक्क संदर्भात जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता कोणतेही पुरावे न बघता अंतिम आदेश काढले आहे या आदेशाची पुन:पडताळणी करण्यात यावी यासाठी नंदुरबार ते मुंबई असा पायीमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो आदिवासी भगिनी व बांधव नाशिक पर्यंत पायी चालत गेल्यावर नागपूर अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावले होते .यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमलबजावणी संदर्भात लेखी आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तसेच वनपट्टा धारक आदिवासीं शेतकऱ्याचे सातबारा दुरुस्ती करण्यात यावी, वनपट्टा धारकांच्या जमिनीत, विहीर बोअर खोदू शकता त्यात वन खात्यांनी हस्तक्षेप करणार नाही, किंवा त्याची परवानगीची गरज नाही, तसेच आदिवासी साठी अनेक योजना राबवल्या जातात त्याना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, मागेल त्याला सोलर पंप योजना तसेच कुसुम सोलर पंप योजनामधून वनहक्क दावेदाराचा डाटा उपलब्ध नसल्यामुळे वगळण्यात आले आहे .या योजनेचा लाभ देण्यात यावा , आदिवासी वन हक्क दावेदारांची पीक पाहणी अँप मध्ये होत नसल्यामुळे सदर अँप दुरुस्ती करण्यात यावे व पीक पेराची नोंदणी करण्यात यावी, शबरी घरकुल चे आदेश वाटप करून एक वर्ष उलटून सुद्धा घरकुलचा लाभ दिला नाही त्यांना लाभ द्या,या सह सर्व मागण्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी मान्य केले असून यावर सकारात्मक चर्चा करण्यात येऊन संबधीत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. तरी येत्या काही दिवसात आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सांगण्यात आले .या बैठकीला कॉ करणसिंग कोकणी ,काँ आर.टी .गावित, रणजीत गावित, दिलीप गावित , विक्रम गावित ,शितल गावित, गेवाबाई गावित, लिलाबाई वळवी, जमनाताई वळवी, ,उत्तम गावित, ,साईद कुरेशी, सेल्या गावित, दिवाणजी गावीत रामदास गावीत गोबजी गावीत गावित , ,राजेश गावित, जालमसिंग गावित, सुनील वळवी, प्रभाकर गावित ,विक्रम गावीत व वनहक्क दावेदार शेतकरी उपस्थित होते....