कोंडाईबारी घाटाच्या वरील हॉटेल आशीर्वाद येथून ते बेडकी चेक पोस्ट पर्यंत पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिलेले आहे. त्यामुळे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे आंदोलन समन्वयक दिलीप नाईक यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ (५३) या महामार्गावर कोंडाईबारी पासून बेडकी चेक पोस्ट पर्यंत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी, वारंवार अपघात होणाऱ्या अपघात स्थळांची पाहणी ,तसेच या महामार्गालगत असलेल्या गावांना महामार्गावर ये जा करताना, रस्ता ओलांडताना ,ज्या अनेक समस्या येतात त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी रस्ता रोको आंदोलनाची नोटीस जिल्हाधिकारी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना दिलेली होती. नोटीस प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या काही प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये 31 मे 2025 रोजी बैठक बोलावलेली होती. या बैठकीमध्ये आंदोलनकर्ते आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे कोंडाईबारी ते बेडकी चेक पोस्ट या महामार्गाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करण्याबाबत ठोस नियोजनाचे पर्याय सुचवावे असे ठरले होते.
दहा दिवस नंतर देखील राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही काम केले नाही म्हणून दिनांक 10 जून 2025 रोजी पुन्हा नोटीस पाठविण्यात आली. या नोटीसीची दखल घेऊन दिनांक 12 जून 2025 रोजी सकाळी कोंडाईबारी घाटाच्या वरील हॉटेल आशीर्वाद येथून ते बेडकी चेक पोस्ट पर्यंत पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिलेले आहे. त्यामुळे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे.
या महामार्गालगत असलेल्या गावातील सर्व नागरिकांना विनंतीपूर्वक कळविण्यात येते की आपल्या गावामधून महामार्ग जात असताना कोणत्या अडचणी येतात, रस्ता कोणकोणत्या ठिकाणी खराब आहे, कोणत्या ठिकाणी बायपासचे काम झाले आहे, परंतु निकृष्ट दर्जाचे झालेले आहे, कोणत्या ठिकाणी वाहतुकीसाठी फार मोठ्या अडचणी उद्भवतात ,ज्याच्यामुळे अपघात संभवतो अशी ठिकाणे कोणती आहेत गतिरोधक कोणत्या ठिकाणी बसविणे आवश्यक आहे. या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी महामार्गालगत आपण येऊन आपल्या गावातील नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपामध्ये महामार्गाच्या अधिकाऱ्यांना द्याव्या त्याच बरोबर त्याची एक प्रत आंदोलन करताना द्यावी जेणेकरून आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढील उपाय योजना करता येईल. सदरचा मेसेज ज्यांना मिळाला असेल त्यांनी राष्ट्रीय महामार्ग लगतच्या सर्व गावांमध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य आणि पोलीस पाटील यांना देखील द्यावा ही विनंती.