लाईट बाजार येथील जेष्ठ पत्रकाराच्या घरासमोरच्या हात पंप एक वर्षापासून नादुरुस्त-तक्रार करूनही ॲक्शन नाही.. नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष..
संपूर्ण लाईट बाजार परिसरातील एकमेव हातपंप-चोरीस जाण्याची भीती..
नवापूर / प्रतिनिधी
नवापूर शहरात विविध भागात असलेले हातपंपांना चांगल्या प्रकारे पाणीही आहे. यापूर्वीच्या टंचाईच्या काळात याच हातपंपानी शहरातील पाणीटंचाईवर मात केली. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत असलेले पंप दुरुस्तीबाबत पालिकेकडून काहीही पावलं उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नवापूर शहरातील लाईट बाजार परिसरातील मध्यभागी असलेल्या भागात एकमेव हातपंप आहे. उन्हाळ्यात या हातपंप मुळे परिसरातील नागरिकांना त्याच्या उपयोग होत आला आहे. मात्र गेल्या एक वर्षापासून हातपंप नादुरुस्त असून नगरपालिके मार्फत अद्याप पर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे हातपंप असून नसल्यासारखे परिस्थितीत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना गैरसोय होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की
नवापूर शहरात लाईट बाजार येथील जेष्ठ पञकार जयंतीभाई अग्रवाल यांच्या घरा समोरील हातपंप एक वर्षापासून नादुरुस्त आहे.या हातपंपचे हळू हळू सर्वच साहित्य चोरीस जात आहे. रात्री अपरात्री भुरटे चोर या भागात फिरून हात पंप चे लोखंडी साहित्य चोरून नेत असल्याचे बोलले जात आहे. परिसरातील नागरिकांनी दुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेकडे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. हातपंपच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. लाईट बाजार परिसर हा शहराच्या मुख्य भाग असून येथे दुकाने व व्यापाऱ्यांची घरे आहेत. या एकमेव हात पंपच्या उपयोग सर्वांना होत होता. मात्र नादुरुस्ती झाल्याने त्याच्या उपयोग होत नसल्याने शोपीस ठरला आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. याकडे नगरपालिकेने अजून दुर्लक्ष केले तर हॅन्ड पंपच चोरीस जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागाने त्वरित याकडे लक्ष देऊन हात पंप दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे