नवापूर तालुक्यातील डोगेगाव येथील सुनिल गावित 66 सुपर लीग मध्ये खेळणार येत्या 22 जून पासून ते 2 जुलै पर्यंत राजस्थान कोटा येथे सामाने सुरू होणारा आहे.
सुनिल गावित हा गोलंदाज म्हणून पंजाब पॉवर हाऊस या संघाने लिलाव मध्ये सामील केला हि लीग मोठ्या दर्जाची असून या मध्ये 6 संघ समावेश केला गेला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व तसेज रणजी स्पर्धेत खेळलेले खेळाडू सुद्धा खेळताना दिसतील सुनिल गावित क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये सुनील गावित यांना स्थान मिळाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
या लीग मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू , पवन नेगी, सौरभ तिवारी, मनप्रीत गनी, स्टुअर्ट बिनी, असे अनेक इंडियन प्लेअर्स आहेत. व विदेशी प्लेअर्स व आयपीएल खेळलेले प्लेअर्स सुद्धा खेळताना दिसणार आहेत. व नंदुरबार जिल्ह्यातून अनिल वसावे, सचिन वसावे व आशिष पाडवी यांचा या टुर्नामेंट मध्ये समावेश झाला आहे.