नंदुरबार जिल्ह्यात ग्रामस्वयंपूर्णतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-पथदर्शी डेअरी योजना – NDDB अभ्यास समितीची जिल्हा भेट
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ (NDDB), मुंबई येथून आलेल्या अभ्यास समिती सदस्यांसोबत जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामस्थांचे आर्थिक स्वयंपूर्ण जीवनमान वाढविण्यासाठी पथदर्शी योजनेच्या संदर्भात बैठक घेण्यात आली.
बैठकीत जिल्ह्यातील स्थलांतर, दुग्ध व्यवसाय, महिला सहभाग, सायलेज निर्मिती, विपणन व प्रक्रिया यासारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
यानंतर काकर्दे व भादवड गावातील:
🔹 महिला बचत गटाचे दूध संकलन केंद्र
🔹 चौधरी डेअरी फार्म
🔹 सायलेज/मुरघास युनिट
या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन NDDB अभ्यास समितीने पायाभूत सुविधा व उपलब्ध संसाधनांचे निरीक्षण केले.
यावेळी मा. जिल्हाधिकारी मॅडम यांनी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करून स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर द्यावा असे स्पष्ट निर्देश दिले.
NDDB अभ्यास समितीने लवकरच जिल्ह्यासाठी विशेष योजना तयार करून सादर करण्याचे आश्वासन दिले.
.