आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात ARMMAN संस्थेच्या प्रतिनिधींसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मा. डॉ. मित्ताली सेठी (IAS) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत मातृ आणि बाल आरोग्य सेवा सुदृढ करण्याच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी योजनेवर चर्चा करण्यात आली.
Tech + Touch मॉडेल अंतर्गत पुढील उपक्रम राबविले जाणार –
🔹 आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांचे सक्षमीकरण
🔹 High-Risk Pregnancy Tracking System ची अंमलबजावणी
🔹 IHRPTM, आरोग्यसखी व स्वस्थ पाऊल (Swath Kadam) कार्यक्रमांची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन उपक्रम
या भागीदारीतून जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील गरोदर मातांना, बालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दर्जेदार, वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्हा प्रशासन नंदुरबार व ARMMAN संस्था यांचा एकत्रित उपक्रम – जनतेच्या आरोग्यासाठी एक सकारात्मक पाऊल. !