नवापूर तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिनांक १७ मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात नवापूर तालुक्यातील प्रमुख आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला.
हा प्रवेश सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे, शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, तसेच आमदार आमश्या पाडवी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमात नवापूर येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला: त्यात
शंकरभाऊ दर्जी माजी उपजिल्हा प्रमुख शिवसेना नवापूर
गणेश वडनेरे (माजी. नगरसेवक तथा मा. तालुकाप्रमुख)
मनोज बोरसे (जिल्हा उपसंघटक, नंदुरबार
गोविंद मोरे - मा.शहर प्रमुख शिवसेना नवापूर
राहुल टिभे - जिल्हा समन्वयक युवासेना, नंदुरबार
या प्रवेश सोहळ्यामुळे नवापूर शहर व तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला बळकटी मिळाली असून, पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. याआधीही नवापूर शहरातील अनेक युवकांनी शिंदे गटात प्रवेश करून आपली निष्ठा दाखवली आहे.
पक्षप्रवेशाची ही मालिका यापुढेही सुरू राहणार असून, नवापूरमधील इतर अनेक आजी-माजी शिवसैनिक लवकरच शिंदे सेनेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.