नंदुरबार जिल्ह्यात भूमि अभिलेख चे उपसंचालक यांचा दौरा;नागरिकांशी साधणार थेट संवाद
नंदुरबार, दिनांक 10 जून, 2025 (जिमाका) :
भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक महेश इंगळे (नाशिक विभाग) शुक्रवार, दिनांक 13 जून 2025 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या शासकीय दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, भूमि अभिलेख विभागाशी संबंधित प्रलंबित कामकाजांबाबत जनतेच्या तक्रारी व अडचणी ऐकणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील ज्या नागरिकांना आपल्या भूमि अभिलेख विभागाशी संबंधित तक्रारी, प्रश्न अथवा प्रलंबित प्रकरणांबाबत उपसंचालक श्री. इंगळे यांना थेट भेटायचे असल्यास, त्यांनी दिनांक 13 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या दौऱ्याचा उद्देश नागरिकांच्या अडचणींना तातडीने प्रतिसाद देणे आणि भूमी अभिलेख विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रत्यक्ष संवाद साधणे हा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या संवाद बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख यांच्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0000000000