नंदुरबार, दिनांक 10 जून, 2025 (जिमाका) :
तहसील कार्यालय, शहादा यांच्यामार्फत महसूल मंडळ प्रकाशा अंतर्गत असलेल्या ससदे डेपोतील शिल्लक गाळ व गाळ मिश्रीत वाळूच्या साठ्यासाठी खुल्या बोलीचा लिलाव 13 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय शहादा येथे होणार असल्याचे तहसिलदार दिपक गिरासे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
लिलावात भाग घेण्यासाठी, इच्छुक बोलीदारांना आधारकार्ड/ओळखपत्र, पॅन कार्ड, जीएसटी नोंदणी (असल्यास), मागील अनुभवाचे प्रमाणपत्र (असल्यास) आणि रुपये 5 हजार अनामत रक्कम (डिमांड ड्राफ्ट किंवा रोखीने) ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. लिलावासाठीचे पात्रतेचे निकष आणि इतर अटी व शर्ती तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत.
लिलावाच्या वेळी सर्व बोलीदारांना वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. प्रशासनाला कोणताही कारण न देता लिलाव रद्द किंवा स्थगित करण्याचा पूर्ण अधिकार असेल. वाळू उचल करताना पर्यावरणीय कायदे, शासनाचे नियम आणि स्थानिक प्रशासनाचे निर्देश यांचे पालन करणे बंधनकारक राहील.
अधिक माहितीसाठी तहसिल कार्यालय, शहादा दूरध्वनी क्रमांक 02565-224500 यावर संपर्क साधता येईल, असेही तहसिलदार श्री. गिरासे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000000000