नवापूर, (प्रतिनिधी) नवापूर येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय तानाजी वसावे यांची भारतीय जनता पक्षाच्या ०४ नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे.तसेच जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी हे नियुक्तीपञ अजय वसावे यांना दिले आहे
नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार अजय वसावे यांची नियुक्ती करण्यात येत आहे. जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्तीच्या पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर आणि बलशाली भारताच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी अजय वसावे यांनी प्रयत्नशील राहावे, तसेच भारतीय जनता पक्षाचे विचार, ध्येय आणि धोरण सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून संघटन वाढीसाठी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.