साईभक्त आणि शिक्षक या दोन भूमिका एकत्र असलेले व्यक्तिमत्व श्री सुरेश पौलाद पाटील उर्फे विनुभाऊ पाटील यांच्या आज ७५ व्या वर्षाच्या वाढदिवस..
या व्यक्तीने केवळ शिक्षकाची भूमिका बजावली नाही, तर ते एक निष्ठावान साईभक्त देखील आहेत. त्यांच्या या दोन्ही भूमिकेमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिक खास बनले आहे.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान आणि चांगले संस्कार दिले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यांच्या शांत आणि नम्र स्वभावामुळे ते सर्वांनाच सुपरचित आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व नेहमी प्रसन्न असते व मृदु भाषा,सरळ स्वभावाचे असल्याने ते सर्वांना प्रिय आहेत.
साईबाबांच्या भक्तीने त्यांच्या जीवनात एक वेगळीच ऊर्जा आणि सकारात्मकता भरली आहे. त्यांनी आपल्या भक्तीतून जीवन जगण्याचा एक वेगळा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या जीवनात साईबाबांचे मौलिक विचार सोबत राहिले आहेत ज्यामुळे ते नेहमीच आनंदी आणि सकारात्मक राहतात.
श्री सुरेश पाटील उर्फे विनु पाटील यांच्या आयुष्याची सुरुवात वडफळी आश्रम शाळेत कारकून म्हणून झाली. नंतर शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे कारकुन म्हणून ते कार्यरत राहिले नंतर बी.ए बीएड पदवी उत्तीर्ण होऊन हिंदी विषयात उत्तम शैलीत अध्यापन केले. नवापूर शिक्षण शास्त्र महाविद्यालयात त्यांच्या प्राचार्या डॉ नलिनी पाटील यांनी आदर्श बीएड विद्यार्थी म्हणून गौरव केला होता. आपल्या आयुष्यात त्यांनी तीन पालकांच्या उल्लेख केला त्यात जन्मदाते- आई वडील पालन पोषण करणारे तीन मामा त्यात कै. निलकंठ केशव पाटील, कै. प्रताप केशव पाटील, श्री वसंत केशव पाटील तर दुसरीकडे आयुष्यासाठी रोजगार देणारे नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै. रमेश शिवराम पाटील व आपल्या संस्थे विषयी आज सुद्धा ते कृतज्ञता भाव करीत असतात. श्री शिवाजी हायस्कूल येथे नोकरी करणे जवळच श्री शिवाजी कॉलनीत राहणे तेथून साई मंदिरात बाबांचे दर्शन घेऊन नंतर श्रीरंग अवधूत महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेणे हा त्यांचा रोजच्या दिनक्रम ठरलेला असतो. सेवानिवृत्तीच्या काळानंतर काही प्रसंगांना सामोरे जात त्यावर त्यांनी मात केली. सुखदुःखाच्या काळात त्यांना त्यांची पत्नी लिलाबाई यांची भक्कम लाभली आहे. किती संकट आली तरी चेहऱ्यावर स्मितहास्य,अपडेट राहणे, हळुवार बोलण्याची लकब, सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस करणे असा चेहरा समोर येतो.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
त्यांना जीवनात सुख, शांती आणि समृद्धी,उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे.
साईबाबांच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन आनंददायी हो हीच प्रार्थना..!
-----------------------------------------
शुभेच्छुक-
हेमंत विक्रम पाटील
नवापूर जि. नंदुरबार
भ्रमणध्वनी क्र-9823610627
-----------------------------------------