नवापूर नगरपालिकेच्या एका महिला सफाई कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीला मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी स्वतःच्या खुर्चीवर बसवुन दिला सन्मान..
सफाई कर्मचारीचा कष्टाची
जाण ठेवली मुख्याधिकारीनी दिला सन्मान- कंकूबाई ऋषी गहिवरल्या-
नवापूर प्रतिनिधी--
इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु झाली. पण ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवलेले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते. अशा शेवटच्या क्षणी जर मोठा सन्मान मिळाला तर आपण केलेल्या सेवा बद्दल समाधान वाटते याचा अनुभव नवापूर नगरपालिकेच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात आला त्याचे झाले असे की
नवापूर येथील नगरपरिषदेच्या
आरोग्य विभागात ३१ वर्षे प्रामाणिक सेवा बजावलेल्या श्रीमती कंकु अश्विन ऋषी
आज सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाल्या. एक निष्ठावान आणि कर्तव्यनिष्ठ सफाई कर्मचारी
म्हणून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शहराच्या स्वच्छतेसाठी समर्पित केले.या भावनिक क्षणी मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांनी श्रीमती कंकू ऋषी यांना स्वतःच्या खुर्चीवर बसवुन सन्मान दिला. हे सर्व बघून कुंकू ऋषी भारावल्या. मुख्याधिकारी यांनी दिलेला सन्मान हा त्यांच्या
कष्टाला दिलेला हृदयस्पर्शी सलाम ठरला.हा क्षण उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. श्रीमती कंकु ऋषी यांचा सेवेचा मार्ग हा पुढील पिढ्यांसाठी आदर्शवत ठरावा,असे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले.नगरपरिषदेच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह व शुभेच्छा देऊन पुढील आयुष्यासाठी उत्तम
आरोग्य व आनंदी जीवनाच्या सदिच्छा देण्यात आल्या. कष्टाची खरी किंमत म्हणजे असा सन्मान. श्रीमती. कंकु अश्विन ऋषी यांना सेवानिवृत्ती नंतरच्या नव्या प्रवासासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. त्याही आपल्याला देण्यात आलेला सन्मान पाहून गहिवरल्या होत्या. एका सफाई कामगार महिलेला सेवानिवृत्तीच्या दिवशी मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी दिलेला सन्मान नवापूर नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नोंद झाला आहे. असे विचार व केलेली कृती मुख्याधिकारी यांच्या कार्याला सन्मानित करणारी आहे