@ हलगर्जी कोणाची महामार्ग ठेकेदार की दुसरे कोणी..? संतप्त जनतेच्या सवाल..!!
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघात थांबायला तयार नाहीत एका दिवसात अपघात होत असल्याने वाहन चालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. महामार्ग झाल्यापासूनच अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे. महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रशासन त्यांच्या दृष्टीने प्रयत्नशील जरी असले तरी महामार्गावरील ठेकेदार गंभीर नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे महामार्गावर अपघात रोखण्यासाठी खास उपाययोजना करणे तेवढेच गरजेचे आहे.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर गंगापूरजवळ एक महाकाय कंटेनर (वाहन क्रमांक KA 63.6395) पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर हे वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच, विनामूल्य सेवा देणारी नाळीज धाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वसामान्य नागरिक हा प्रश्न विचारत आहेत की, या महामार्गावरील अपघातांना आळा कधी बसणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करण्यासाठी गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण