जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवापूर नगरपालिकेतर्फे नाना नानी पार्क येथे वृक्षारोपण..
@परिसरातील रहिवाशांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांना मुख्याधिकाऱ्यांनी सोपवली वृक्ष संवर्धनाची जबाबदारी.. केले मार्गदर्शन..!!
दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाच्या होत असलेल्या ऱ्हासामुळे गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलाचे चटके अधिक तीव्र होऊ लागले आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ हा मनुष्य प्राण्यासाठी अत्यंत खडतर असणार आहे.पर्यावरणाचे जतन हा त्यावरील एकमेव उपाय आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरुकता वाढवणे गरजेचे आहे ही जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) पुढाकार घेतला होता. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यास सुरुवात केली, आणि तेव्हापासून विविध देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने नवापूर नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी डॉ.मयूर पाटील यांच्या पुढाकाराने नवापूर शहरातील नाना-नानी पार्क मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम रहिवाशांच्या उपस्थितीत संपन्न झाला. परिसरातील महिला वर्ग, युवा वर्ग यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ.मयूर पाटील यांनी वृक्षारोपण रहिवाशांच्या उपस्थितीत करून त्यांना वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोपवली. यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी यांनीही वृक्षारोपण केले. मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी वृक्षारोपण काळाची गरज का आहे याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. तसेच येत्या काळात स्मुर्तीवन करण्याच्या मानस असल्याचे सांगितले. प्रत्येकाला एक एक झाड दत्तक देणार असल्याचे सांगून पर्यावरणाची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे असे डॉ मयूर पाटील यावेळी म्हणाले.नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी परिसरातील रहिवाशी, पत्रकार उपस्थित होते.