एमबीबीएस पदवी परदेशात मिळवणारी नवापूरची डॉ देवयानी अहिरे--भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात भरीव योगदान देणार..
नवापूर येथील एक प्रतिभावान विद्यार्थिनीने एमबीबीएस पदवी परदेशात मिळवून एक यश मिळविले आहे.
नवापूर शहरातील चर्मकार समाजाची डॉ.देवयानी आनंदराव अहिरे हिने रशिया येथे विदेशात वैद्यकीय क्षेत्रातील स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल या विद्यापीठातून एमबीबीएस पदवी संपादन केली आहे.देवयानी या विद्यार्थिनीं ने आपल्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली आणि तिच्या या यशानंतर तिने नवापूर शहराचे नाव उंचावले आहे. तिला भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा आहे आणि ती यासाठी पूर्णपणे समर्पित आहे.
या यशानंतर डॉक्टर देवयानी तिच्या आई-वडिलांना, शिक्षकांना आणि मैत्रिणींना धन्यवाद देते. तिने आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या पाठिंब्याला दिले आहे. तिच्या या यशाबद्दल नवापूरमध्ये तिचे कौतुक व्यक्त केले जात आहे.
देवयानी ही नवापूर येथील चर्मकार समाजाचे शिक्षक आनंदराव दुल्लभ अहिरे व सुरेखा आनंदराव अहिरे यांची सुकन्या आहे. डॉक्टर देवयानी हिच्या या यशाबद्दल तिचावर समाजातर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.