विसरवाडी गावालगत आमलीपाडा शिवारातील मोकळ्या जागेत कृषी विभागाची धडक कारवाई
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गालगत, विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारातील हॉटेल देव सवाई भोज जवळील मोकळ्या जागेत, कृषी विभागाने धडक कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया 50 किलो ग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या सहाशे ब्यागा व टाटा कंपनीचा ट्रक दहा लक्ष रुपयाचा असा एकूण 23 लक्ष 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात कृषी विभागाने शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून, सुमारे 50 किलो ग्रॅमच्या सहाशे ब्यागा एकूण 13 लक्ष 95 हजार किंमत व दहा लक्ष रुपये किमतीचा टाटा कंपनीचा माल ट्रक असा एकूण 23 लक्ष 95 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे,
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया 50 किलो ग्रॅमच्या सहाशे ब्यागा या आय आर ट्रेडर्स वसंत बहार आरएच नंबर एक, टाकी रोड उपनगर नाशिक, योगी एंटरप्राइजेस प्लॉट नंबर 4 सर्वे नंबर 714 पक्की गोंधळ जमावाडी राष्ट्रीय महामार्ग संस्टार ऍग्री कोल्ड गोंडल राजकोट, गुजरात, व नाथ देवराज कोडियातर राहणार छाया प्लॉट पोरबंदर गुजरात हे संगणमत करून, कृषी वापरासाठी शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया हा, पन्नास किलोग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या बॅगमध्ये भरून, सदर बॅगवर टेक्निकल ग्रेड युरिया, फॉर इंडस्ट्रियल यूज ओन्ली, मंथ ऑफ इम्पोर्ट ऑक्टोंबर नोव्हेंबर 2024 पर्पज युज इंडस्ट्रियल युज ओन्ली, वेट पन्नास किलोग्रॅम असे छापून, सदरच्या गोण्या या ट्रक क्रमांक जी जे 25 यु 5795 यात भरून, विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग लगतच्या, विसरवाडी गावाजवळील आममलीपाडा शिवारात असलेल्या देव सवाई भोज हॉटेलच्या मोकळ्या जागेत आढळून आल्याने, याबाबत नंदुरबार जिल्हा कृषी कार्यालयातील (रासायनिक खते बियाणे कीटकनाशके) जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्निल अरुण शेळके यांनी, विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सदर आरोपी विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात 183 / 2025 भारतीय न्याय संविधान कलम 316, 318, (4), 3 , (5) सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3 (2), 7, 9, 10 सह खत नियंत्रण आदेश 1985 चे कलम 2 क (KK) (ii) (iii) 7, 19, (C) (i) (ii) (v), 25 (1) (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहे