नवापूर (प्रतिनिधी):
दि. सुटेक्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मल्टीस्टेट बँकेच्या नवापूर शाखेला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम दि.अॅण्ड डी एम. वाय. सार्वजनिक गुजराथी हायस्कूलच्या सेंट्रल हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात सुटेक्सचे सीईओ शितलभाई भट्ट,केडीट चेअरमन महेशभाई जरीवाला, चेअरमन कमलविजय तुलसीयान, नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा उद्योपती विपिनभाई चोखावाला,उपाध्यक्ष शिरीषभाई शहा, मानद सचिव राजेंद्र अग्रवाल, गुजराथी हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका कमलबेन शहा, सुरतचे माज़ी जिल्हाधिकारी दिलीपभाई रावल, सुटेक्स बँकेचे संचालक भिखुभाई देसाई, माजी मुख्याध्यापक रामचंद्र नानुभाई देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दि. सुटेक्स बँकेने यावर्षी यशस्वीरीत्या ५३ वर्षे पूर्ण करत ५४ व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे, नवापूर शाखेने तीन वर्षे पूर्ण करत चौथ्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने, महिला सर्वांगीण विकाससाठी आणि बँकेचा सुविधापासून वंचित असलेल्या तसेच निम्न व मध्यमवर्गीय नागरिकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात बँकेच्या सर्वसामान्य ठेवी योजना, सुवर्णतारण योजना आणि सोलार लोन आणि इलेक्टिक विकल/सी एन जी/ हायब्रिड टू आणि फोर व्हीलर योजनेबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका कमलबेन शहा यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवापूर सुटेक्स बँकेचे शाखा मेनेजर जयदीपभाई देसाई यांनी मानले. सुटेक्स बँक नवापूर परिसरात अल्पावधीत नावारूपाला आली असून बँकिंग सेवांपासून वंचित राहणाऱ्यांचे सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने सुटेस बँक च्या आर्थिक समावेशाच्या प्रवासाचा निमित्ताने केलेला कार्यक्रम विशेष उल्लेखनीय असल्याचे बँक ग्राहकांनी सांगितले.