नवापूर येथील महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात चेतल राजेश पाटील प्रथम-नवापूर महाविद्यालयातर्फे चेतल पाटील हिच्या सत्कार
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत घेण्यात आलेल्या एप्रिल/मे २०२५ टीवायबीएससी परीक्षेत रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु.चेतल राजेश पाटील हिने 9.93 सीजीपीए (९१.२४) टक्के गुण मिळवित नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया च्या रसायनशास्त्र विभागात नुकत्याच झालेल्या परीक्षेत चेतन राजेश पाटील या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान प्राप्त केला. चेतल पाटील ही एक हुशार आणि मेहनती विद्यार्थीनी असून, तिने अभ्यासात नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
रसायनशास्त्र विषयातील तिची रुची आणि अभ्यासातील एकाग्रता वाखाणण्याजोगी आहे. ती नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे.चेतल ही श्री शिवाजी हायस्कूलचे शिक्षक राजेश पाटील यांची सुकन्या आहे
तिला रसायनशास्त्र विभागातील विभागप्रमुख प्रा.आनंदसिंग फत्तेसिंग पाटील,प्रा.वाय.जी. भदाणे,प्रा.डॉ.सचिन काळे,प्रा. अरुण गावित यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शिरीषकुमार नाईक व पदाधिकारी यांनी विशेष कौतुक केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक जैस्वाल यांच्या हस्ते कु चेतल पाटील हिने सत्कार स्वीकारत यशाचे श्रेय रसायनशास्त्र विभागाला व महाविद्यालयाला दिले.सत्कार प्रसंगी उपप्राचार्य प्रा.अनिल पाटील,उपप्राचार्य प्रा.डॉ. मंदा गावित, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.आनंदसिंग पाटील,प्रा.डॉ.सचिन काळे,प्रा. श्रीकांत महाजन उपस्थित होते.
कु. चेतल पाटीलने मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत समाधान व्यक्त केले.