पोलीस अधीक्षकांकडून 10,000/- रुपयांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
नवापूर प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या "Smart E-Beat System" अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा आजरोजी संवाद हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय, येथे सत्कार करण्यात आला. या प्रणालीमध्ये जिल्हयातील महत्वाचे ठिकाणांची निगराणी ठेवण्यासाठी केंद्रीकृत "स्मार्ट ई- बीट" प्रणाली लागू करण्यात आली असुन त्यात धार्मिक स्थळे, एटीएम, बँका, रहिवासी भाग, शाळा, बाजारपेठ परिसर, रेल्वे, बस स्थानक आणि गावांचा समावेश आहे. यामध्ये सर्व ठिकाणी GPS प्रणालीद्वारे जिओ-टॅग करण्यात आले असुन त्याद्वारे 24*7 अशी सतत गस्त घालण्यासाठी बीट मार्शल्सना स्मार्ट ई- बीट सॉफ्टवेअरने सुसज्ज करण्यात आले आहे. सदर बीट मार्शल हे दोन शिफ्टमध्ये ठरवलेल्या भागांमध्ये गस्त घालून सतर्क राहतील. या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीत पुढाकार घेणाऱ्या आणि आपल्या कार्यक्षेत्रात शिस्तबध्द,वेळेवर आणि पारदर्शक गस्त करणाऱ्या अंमलदारांचे यावेळी कौतुक करण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणारे अंमलदार त्यामध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ / 944 शैलेंद्रसिंग प्रेमसिंग राजपुत, पोकॉ / 1419 जलसिंग वाडग्या वसावे, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोकॉ / 1405 योगेंद्र दिलीप पाटील, व शहादा पोलीस ठाण्याचे पोकॉ/856 मिथून सुभाष शिसोदे यांनी कमी वेळेत जास्तीत जास्त बीट पॉईंट ठिकाणी भेट देऊन प्रभावीपणे रात्रगस्त केली म्हणुन त्यांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ तसेच 10,000 रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलतांना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी सांगितले की, या उपक्रमाचा मुख्य उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन जनतेला अधिक चांगली सेवा देणे व अंमलदारांना प्रोत्साहन
देऊन पोलीस दलाचे मनोबल उंचावणे हा आहे.सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, वाचक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स.पो.नि धर्मराज पटले, तसेच इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते.