द.नवापुर एज्युकेशन सोसायटी संचलित ए .के. बालवा मेमोरियल ज्युनिअर कॉलेज येथे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा वाटप करण्यात आल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, नियमित , आणि सुलभ शिक्षण प्रवासासाठी शासनाच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाच्या शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमती. डॉक्टर सिमरन अमोल दिवटे तसेच नवापूर शहराचे आगर प्रमुख विजय पाटील, स्थानक प्रमुख रवींद्र जगताप, वाहतूक नियंत्रक संदीप ब्राह्मणे, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित आगर प्रमुख विजय पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित व मोफत वाहतूक उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे .या उपक्रमामुळे पालकांच्या विश्वास वाढेल व मुलींचे महाविद्यालयात यांनी नियमित होईल..