शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते भांडी संचाचे वितरण आष्ट्यात कार्यक्रम; पश्चिम पट्ट्यातील लाभार्थ्यांना लाभ
नंदुरबार (प्रतिनिधी)- शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आष्टा ता.नंदुरबार येथे भांडी पेटी संचाचे वितरण करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमधील लाभार्थ्यांना पेट्या देण्यात आल्या.
इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व भांडी पेट्या देण्यात येत असतात.या अगोदर पेट्यांची वितरण नंदुरबार येथे एकाच ठिकाणी करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होत होता. ८ ते १० तास रांगेत उभे राहून देखील लाभार्थ्यांना वेळेवर भांड्यांच्या पेट्या मिळत नव्हत्या. लाभार्थ्यांना सोईचा दृष्टिकोनातून गाव निहाय भांड्यांच्या पेट्या वितरणाची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी या अगोदरच केली होती. त्यामुळे सध्या गाव स्तरावरच वितरण करण्यात येत आहे.
बुधवारी नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आष्टा,ठाणेपाडा, घोगळगाव,अंबापूर,अजेपुर,हरिपूर, आमदार पाडा, सुतारे, वाघाळा,श्रीरामपूर, सोनगीरपाडा,ओझर्डे,काळंबा गावातील लाभार्थ्यांना शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पेट्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन माजी पं.स उपसभापती कमलेश महाले यांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,माजी सभापती विक्रमसिंह वळवी,माजी जि.प सदस्य देवमन पवार,माजी पं.स उपसभापती संतोष साबळे, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील,पुरुषोत्तम पाटील,माजी पं.स देवमन चौरे, सरपंच सुहासबाई पवार,राजेंद्र गांगुर्डे,सुरेश भोये,भरत बागुल,संजय चौरे,धर्मेंद्र परदेशी,भरत साबळे,नारायण धोडरे,आत्माराम खाडे आदी उपस्थित होते.