प्रभागातील समस्या मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांचा कडून त्वरित ॲक्शन... नवापूरकरांनी मानले समाधान..
प्रभागातील समस्या-आपला प्रभाग आपली ही तेवढीच जबाबदारी महत्वाची..
नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील यांनी नवापूरकर रहिवाशांना परिसरातील स्वच्छतेबाबत मौलिक संदेश देत जनजागृती केली. तसेच आपल्या परिसरातील समस्या बाबत आपण ही जागृत राहणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे सांगून मुख्याधिकारी यांनी जनजागृती निर्माण करण्याच्या अल्पसा प्रयत्न केल्याने रहिवाशांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्याचे झाले असे की नगरपालिकेतर्फे नवापूर शहरातील जनता पार्क भागातील नाना-नानी पार्क येथे जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपणाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर परिसरातील रहिवाशांनी आपल्या परिसरातील उघड्या असलेल्या गटारी व उघड्यावर होत असलेले घाणीचे साम्राज्य मुख्याधिकाऱ्यांना दाखवले. यावर मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी तातडीने नगरपालिकेचा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून परिसर स्वच्छ व उघड्या गटारी बंदिस्त करण्याच्या सूचना दिल्या प्रसंगी त्यांनी रहिवाशांना आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबत आपण जागृत असणे तेवढे गरजेचे असल्याचे सांगून आपलेही याबाबत कर्तव्य असल्याचे सूचित केले. आपल्या प्रभागातील काळजी आपण कशाप्रकारे घ्यावी प्रत्येक गोष्ट नगरपालिकेवर अवलंबून न राहता आपलेही कर्तव्य म्हणून आपला प्रभाग आपली जबाबदारी तेवढीच महत्त्वाची असल्याचे सांगितले. परिसरातील रहिवाशांना ही मुख्याधिकाऱ्यांच्या मौलिक सल्ला पटला. त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी मुख्याधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत जनता पार्क, मंगलदास पार्क भागातील रहिवाशांच्या समस्या जाणून परिसराची पाहणी केली. व योग्य त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील रुजू झाल्यापासून त्यांनी नागरिकांच्या समस्यांची तातडीने दखल घेऊन कारवाई केल्याच्या अनुभव नवापूरकरांना येत आहे. सोशल मीडियावर जरी आपल्या प्रभागातील समस्या टाकली तर त्यावर त्वरित ॲक्शन मुख्याधिकारी घेत असल्याने नवापूरकरांनी समाधान व्यक्त केले आहे