Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

आ.चंद्रकांत रघुवंशींची मानहानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

आ.चंद्रकांत रघुवंशींची मानहानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई कराहासंतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
नंदुरबार (प्रतिनिधी)- शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांना बेकायदेशीररित्या काळे झेंडे दाखवीत लोकप्रतिनिधींच्या हक्क व अधिकारांवर  गदा आणणारे तसेच सोशल मीडियाचा माध्यमातून मानहानी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सोमवारी संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सकाळी जिल्हाधिकारी मिताली सेटी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, दि.16 मे  रोजी शहादा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हार टाकुन शिवसेना कार्यालयाकडे जात असतांना आ.आमश्या पाडवी यांचेसह जिल्हातील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांसमोर शिवसेनेचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांना बेकायदेशिररित्या काळे झेंडे दाखवित विनाकारण अडथळा निर्माण केला तसेच जाणूनबुजून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुशिलकुमार पावरा, रविंद्र वळवी, रोहिदास वळवी यांच्यासह सोबत असणाऱ्या त्यांचा कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिस प्रशासनाने लागलीच त्यांना रस्त्यात अडविल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांवर प्राणघातक हमला होण्याची दाट शक्यता होती. 

लोकप्रनिधींची प्रतिमा मलीन

आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी आदिवासी संघटना किंवा आदिवासी समाजाबद्दल कोणत्याही प्रकारचे अपशब्दांचा प्रयोग केलेला नसुन आदिवासी समाजाचा अपमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नसतांना सुध्दा सुशिलकुमार पावरा, रविंद्र वळवी, रोहिदास वळवी व त्यांचे कार्यकर्त्यांकडून आ.रघुवंशी यांच्या बद्दल अत्यंत खालच्या स्तरावर भाषेचा प्रयोग करुन जेष्ठ लोकप्रनिधींची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले जात आहे.

बदनामीकारक वक्तव्य; शिवसैनिकांच्या रोष

सुशिलकुमार पावरा, रविंद्र वळवी, रोहिदास वळवी व त्यांचे कार्यकर्ते हे अनेक दिवसांपासुन आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या बद्दल सोशल मिडीयावर व्हॉट्स अॅप, इंस्टाग्राम, फेसबुक, इत्यादी प्रसार माध्यमातुन खोटे आरोप करणे, भुमाफीया, आदिवासी विरोधी, परप्रांतीय चोर, आदिवासी आरक्षण विरोधी जातीवादी असे शब्द वापरून आदिवासी समाजाच्या लोकांच्या मनात लोकप्रतिनिधी बद्दल असंतोष निर्माण करणारे बदनामीकारक वक्तव्य करीत आहेत असल्याचे निवेदनात नमूद करून शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनाही निवेदन

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या बद्दल खोटे आरोप व आदिवासी समाजामध्ये लोकप्रतिनिधी बद्दल तेढ निर्माण करणाऱ्या सुशीलकुमार पावरा रवींद्र वळवी रोहिदास वळवी व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना देखील पाठवण्यात आली आहे.

निवेदनावर जि.प माजी अध्यक्ष रमेश गावित, माजी सभापती विक्रमसिंह वळवी,माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी जि.प सदस्य देवमन पवार,माजी पं.स सभापती दीपमाला पाडवी,माजी सभापती अंजना वसावे,माजी सभापती माया माळसे, माजी पं.स सदस्य कलाबाई भील, बायजाबाई भिल,माजी नगरसेविका मनीषा वळवी,माजी नगरसेविका सोनिया राजपूत,माजी पं.स उपसभापती संतोष साबळे, माजी पं.स सदस्य देवमन चौरे, युवा सेना तालुकाप्रमुख राजेश वसावे, उप तालुकाप्रमुख अमिताभ वसावे, धमडाई सरपंच विजय पाडवी, रकासवाडे सरपंच अविनाश पाडवी,धानोरा सरपंच रीना पाडवी, करणखेडा सरपंच जमीलाबाई नाईक,केसरपाडा सरपंच सुलोचना वसावे, दहिंदुले सरपंच राजेंद्र वळवी, उपसरपंच योगेश पाडवी,लहान शहादा उपसरपंच विजय भील,अजेपुर सरपंच लिलाबाई चौरे,सुतारे सरपंच सुहासिनीबाई पवार,बिलाडी सरपंच जतनबाई वळवी,युवा सेना तालुका समन्वयक अजय नाईक,युवासेना सदस्य आकाश नाईक,प्रकाश पाडवी,चेतन वळवी,नांदरखे सरपंच लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.