Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

SDG स्कूल अवॉर्ड-२०२५ ने सन्मानित: श्रीमती एस. एम. चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमीचा देदीप्यमान गौरव..

SDG स्कूल अवॉर्ड-२०२५ ने सन्मानित: श्रीमती एस. एम. चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमीचा देदीप्यमान गौरव..

नवापूरच्या शैक्षणिक क्षितिजावर एक नवा तारा चमकला 

नवापूर प्रतिनिधी--
दि नवापूर एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित श्रीमती एस. एम. चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी, नवापूर या विद्यालयाला केंद्र सरकारच्या नीती आयोगांतर्गत Centre for Educational Development (CED) मार्फत SDG School Award - 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रोफेसर अनिरुद्ध पंडित आणि डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे निबंधक डॉ. विलास पाध्ये यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला.

Sustainable Development Goals (SDGs) म्हणजेच शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शाळेने केलेल्या अतुलनीय आणि कटिबद्ध कार्याची ही पावती आहे. पर्यावरणाची जोपासना, सामाजिक समानता आणि आर्थिक समृद्धी या त्रिसूत्रीवर आधारित शाश्वत विकासाच्या मूल्यांची रुजवात शाळेने केवळ अभ्यासक्रमातच नव्हे, तर दैनंदिन उपक्रमांमध्येही केली आहे.

मुख्याध्यापिका डॉ. सिमरन अमोल दिवटे यांचे दूरदर्शी नेतृत्व...

या देदीप्यमान यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सिमरन अमोल दिवटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला आणि समर्पित कार्याला जाते. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना शाश्वत विकासाच्या दिशेने प्रेरित करत एक सकारात्मक आणि चिरस्थायी शैक्षणिक वातावरण निर्माण केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण, जल संवर्धन, महिला सक्षमीकरण कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य शिबिरे असे विविध स्तुत्य उपक्रम शाळेने यशस्वीरीत्या राबवले. डॉ. सिमरन अमोल दिवटे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि समाजभिमुख दृष्टिकोन संपूर्ण संस्थेसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

संस्थेचे मोलाचे पाठबळ

शाळेच्या या नेत्रदीपक यशात संस्थेचे सर्वच सभासद मंडळाने दिलेले उत्कृष्ट भौतिक सुविधांचे पाठबळ आणि उपक्रम राबवण्यासाठी दिलेली आर्थिक मदत यांचा मोलाचा वाटा आहे. याप्रसंगी, शाळेचे अध्यक्ष विपिन चोखावाला, कार्यकारी अध्यक्षा शीतल वाणी, उपाध्यक्ष शिरीष शहा, सचिव राजेंद्र अग्रवाल, सहसचिव हाजी शोएब मांदा, कोषाध्यक्ष सतीश शहा आणि इतर सर्व सदस्यगण यांनी डॉ. सिमरन दिवटे यांचा विशेष गौरव करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

(कोट करणे)
हा पुरस्कार केवळ श्रीमती एस. एम. चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमीसाठीच नव्हे सर्वांचा आहे. पुरस्कार हा परिसरासाठी अभिमानास्पद आहे. हे यश शाळेच्या गुणवत्तापूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या सजग शिक्षण पद्धतीची थेट पावती असून, भविष्यातही शाळा असेच उत्तुंग यश संपादन करेल यात शंका नाही.
@ डॉ.सिमरण दिवटे
मुख्याध्यापिका नवापूर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.